*कोकण Express*
*सावंतभोसले वंशबांधवांचाकणकवली येथे उद्या मेळावा*
*कणकवली ः प्रतिनीधी*
सावंत भोसले श्रीकुलस्वामिनी प्रतिष्ठान , मुंबई आयोजित सावंतभोसले वंशबांधवांचा भव्य मेळावा मंगळवार १ ९ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वा . मराठा मंडळ सभागृह , कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे.
प्रामुख्याने तळकोकणात बहुसंख्येने स्थित असलेल्या सावंतभोसले ह्या ९६ कुळी मराठा समाजाची कुलस्वामिनी भवानी माता ही सावंतवाडी तालुक्यात कुणकेरी येथे आहे .
सध्या प्रतिष्ठानतर्फे कुणकेरी येथे भव्य भक्तनिवासची उभारणी होत असून त्याकरिता प्रतिष्ठानने महाराष्ट्रात ठिकठिकाणी संपर्कमोहीम आखलेली आहे . मंगळवार दिनांक १ ९ जुलै २०२२ रोजी कणकवली येथील मराठा मंडळ सभागृह येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतभोसले मंडळीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सदर मेळाव्यास बहुसंख्येने सावंतभोसले मंडळीनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानचे सरचिटणीस कृष्णा सावंतभोसले ( ९८९२७५८८४४ ) यांनी केले आहे