*कोकण Express*
*देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी राजेंद्र वालकर यांची निवड*
देवगड जामसंडे नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे भाजपचे राजेंद्र वालकर यांची निवड करण्यात आली. बुधवारी दुपारी १२ वा वालकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी १ वा अधिकृत निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष सौ प्रियांका साळसकर, योगेश चांदोस्कर, माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, तालुका सरचिटणीस शरद ठुकरुल, नगरसेवक संजय तारकर, सुभाष धुरी, ज्ञानेश्वर खवळे आदी उपस्थित होते. सर्वांना समान संधी या या तत्त्वानुसार यापूर्वी असलेले उपनगराध्यक्ष उमेश कनेरकर यांनी राजीनामा दिला होता त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती