*कोकण Express*
*मयुरेश लिंगायत यांची भाजपा विधान सभा सोशल मिडीया प्रमुख पदी निवड*
*भाजपा महाराष्ट्र प्रभारी आशिष शेलार यांनी केली निवड…*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
खारेपाटण जि.प. मतदार संघात सोशल मिडीया प्रमुख पद यशस्वी व प्रभावी कामगिरी करत असलेले भाजप पक्षाचे कार्यकर्ते व साळीस्ते गावचे सुपुत्र मयूरेश लिंगायत यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी कणकवली,देवगड व वैभववाडी विधानसभा मतदार संघाच्या सोशल मीडिया प्रमुखपदी निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीची घोषणा भाजप महाराष्ट्र् प्रभारी आशिष शेलार यांनी केली आहे.त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
गेल्या दोन वर्षात खारेपाटण जि प मतदार संघात सोशल मीडिया प्रमुख पदावर यशस्वी व प्रभावी कामगिरी करीत असतानाच आपला अनुभव, उत्तम अभ्यासू भाषाशैलीच्या प्रभावावर कणकवली विधान सभा मतदार संघाचीही नियोजनबद्ध व यशस्वी जबाबदारी पार पाडतील असा विश्वास भाजप जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केला.
नवनिर्वाचित कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघ सोशल मीडिया प्रमुख मयुरेश लिंगायत यांचा नुकताच विशेष सत्कार आमदार नितेश राणे, महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रमोद जठार, रणजित देसाई, जिल्हा बॅंक अध्यक्ष मनिष दळवी, संचालक अतुल काळसेकर आदी मान्यवराच्या प्रमुख उपस्थित जिल्ह्यात करण्यात आला.