*कोकण Express*
*शिवसेना सदस्य नोंदणीला फोंडाघाट मध्ये उस्फुर्त प्रतिसाद*
*शेकडो कार्यकर्त्यांचा केला शिवसेने प्रवेश….*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
कोकणी माणसाला राजकारणामध्ये मोठं करण्याचं काम शिवसेनेने केलं. त्यामुळे शिवसेनेवर विश्वास ठेवणे महत्वाच ठरेल. फोंडाघाट सारख्या ठिकाणी सातत्याने उस्फुर्त प्रतिसाद असतो त्यामुळे आम्ही सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी विकास काम करण्यासाठी कटिबद्ध राहू असे आश्वासन यावेळी युवा नेते संदेश पारकर यांनी दिले.
फोंडाघाट येथील सदस्य नोंदणीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे, तालुकाध्यक्ष शैलेश भोगले, संदेश पटेल, युवा सेना जिल्हाध्यक्ष हर्षद गावडे, अविनाश सापळे, युवा सेना विभाग प्रमुख सिद्धेश राणे, राजू रावराणे, शांताराम रावराणे, सुरेश टक्के, शामराव भोवड, सुभाष सावंत, पवन भोगले, प्रथमेश उरणकार यांच्यासह मोठ्या संख्येने फोंडाघाट मधील शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना पारकर यांनी फोंडाघाट गावातील विकासाची जबबदारी प्रत्येक शिवसैनिकाची असून पालकमंत्री आणि खासदारांच्या माध्यमातून विकास काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भाजपा बुथ अध्यक्ष पांडुरंग लाड, विजय जामदार, रामदास वाळवे, प्रसाद वाळवे, प्रमोद वाळवे, प्रशांत चव्हाण यांच्यासह फोंडाघाट मधील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.