*कोकण Express*
*उपजिल्हा रुग्णालयातील रक्तदान शिबिराला प्रतिसाद*
*युवा रक्तदाता, रोटरँक्त क्लबचे संयुक्त आयोजन*
सावंतवाडी : प्रतिनीधी*
युवा रक्तदाता संघटना सावंतवाडी रोटरॅक्ट क्लब आॅफ सावंतवाडी लोकमान्य मल्टीपर्पोज सोसायटी लिमिटेड, शाखा सावंतवाडी* यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढीमध्ये ८ जुलै २०२२ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, वैद्यकीय अधिक्षक डॉ. श्रीपाद सावंत यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करुन या शिबीराला सुरुवात झाली. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, लोकमान्यचे आनंद सामंत, अरविंद परब, रोटरॅक्ट क्लब आॅफ सावंतवाडीचे मिहिर मठकर, पृथ्वीराज चव्हाण, प्रतिक नाईक आदी उपस्थित होते.या रक्तदान शिबीरास मोठा प्रतिसाद लाभला.
मेहर पडते,वसंत सावंत, संदिप निवळे, राघवेंद्र चितारी, अनिकेत पाटणकर, डाॅ.मुरली चव्हाण,प्रथमेश प्रभू,पंकज बिद्रे, साईश निर्गुण,अर्चित पोकळे,देवेश पडते,जोसेफ आल्मेडा,गुरुप्रसाद चिटणीस,सर्वेश राऊळ,वर्धन पोकळे,ओंकार पोकळे,केदार नाडकर्णी,प्रदिप सावरवाडकर,अवधूत गावडे, प्रकाश चौधरी आदींनी या शिबीरात सहभाग घेतला. अनेकांनी यावेळी रक्तदान केल.
युवा रक्तदाता संघटनेकडून अन्न व औषध प्रशासनाचा निषेध
अन्न व औषध प्रशासनाने ने एलायजा टेस्ट बंधनकारक केल्याने अत्यंत तातडीच्या व दुर्मिळ रक्तगट असलेल्या रुग्णांना रक्ताची आवश्यकता असल्यास रक्तदाते उपलब्ध असूनही रक्त देता येत नसल्याने रुग्णांचा जीव धोक्यात येतो. हे होणारे नुकसान पाहुन अत्यंत तातडीच्या रुग्णांना स्पाॅट टेस्ट करण्याचे निर्देश देण्यात यावेत यासाठी युवा रक्तदाता संघटना सावंतवाडी तर्फे रक्तदाते काळी फित बांधून FDA च्या विरोधात निषेध करत रक्तदान करण्यात आले. तर तातडीच्या रुग्णांना योग्य ती उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी करण्यात आली.