*कोकण Express*
*वरवडे – वरची मुस्लिमवाडी येथील चार बंद घरे चोरट्यांनी फोडली…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहर व परिसरात सुरू असलेले घरफोड्यांचे लोण आता ग्रामीण भागात पसरू लागले आहे. रविवारी रात्री वरवडे – वरची मुस्लिमवाडी येथील चार बंद घरे चोरट्यांनी फोडली. यात चोरट्यांच्या हाती विशेष काही लागले नसले तरी वरवडे सारख्या ग्रामीण भागातही घरफोड्या होऊ लागल्याने आता चोरट्यांना रोखणे हे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे.
दरम्यान, घरफोड्यांची माहिती समजल्यानंतर हवालदार ममता जाधव यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. गयासुद्दीन लतीफ शेख यांच्या घरातील शेगडी व रेग्युलेटर चोरीस गेल्याचे जाधव यांनी संगितले. तर फैमिदा हरून शेख, मुसा महम्मद शेख, अब्दुल्ला युसूफ हडकर हे सर्वजण सध्या मुंबईमध्ये वास्तव्यास असून यांच्या घरातील कोणतीही वस्तू चोरीस न गेल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
