*कोकण Express*
*कळसुली गावच्या प्रभारी सरपंचपदी सचिन पारधीये*
*आमदार नितेश राणे यांनी पारधीये यांचे केले अभिनंदन
*कणकवली | प्रतिनिधी*
कळसुली ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी सचिन पारधीये यांची निवड झाली आहे. निवडीनंतर आमदार नितेश राणे यांनी सचिन पारधीये यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. कणकवली तालुक्यातील कळसुली ग्रामपंचायत सरपंच पद अपात्रतेच्या करणावरून रिक्त झाले होते. सरपंच पदाचा कार्यभार उपसरपंच श्री. सचिन पारधीये यांनी नुकताच स्वीकारला आहे.
श्री.पारधीये हे मागील चार वर्ष ग्रामपंचायत सदस्य व दोन वर्षां पासून उपसरपंच पदी कार्यरत होते. यापुढे ते कळसुली ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच म्हणून काम पाहणार आहेत. आमदार नितेशजी राणे यांनी पारधीये यांचे अभिनंदन करत कळसुली गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वस्त केले आहे. यावेळी प्रवीण दळवी, स्वप्नील गोसावी, हेमंत वारंग, श्री. सावंत व कार्यकर्ते उपस्तित होते.