*कोकण Express*
*ॲड. राहूल नार्वेकर यांच्या पदामुळे सावंतवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्यासहीत सेनेच्या ३९ आमदारांच्या बंडानंतर एकनाथ शिंदे हे भाजपच्या समर्थनातून मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर रविवारी झालेल्या विशेष अधिवेशनात भाजपचे कुलाबा येथील आमदार ॲड. राहूल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. राहूल नार्वेकर यांच्या रुपाने सावंतवाडीला बहुमान प्राप्त झाला असून सावंतवाडीच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर यांना शुभेच्छा देतानाच्या भाषणात ते सावंतवाडीचे सुपुत्र असल्याचा विशेष उल्लेख केला.