*कोकण Express*
*कणकवली येथे ८० व्या युथ पुरुष बॉक्सिंग स्पर्धेला सुरुवात*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली बॉक्सिंग चॅम्पियनशिप कणकवली येथे होत असून बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी संदीप मेस्त्री, स्वप्निल चिंदरकर, डॉ. राजाराम दळवी, संतोष गुराम, सर्वेश दळवी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होत असलेल्या महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना मान्य सिंधुदुर्ग जिल्हा हौशी मुष्टियुद्ध असोसिएशनच्या वतीने ८० व्या युथ पुरुष बॉक्सिंग स्पर्धेला दि.२५ जून पासून सुरुवात झाली. तर २२ जून पासून बॉक्सिंग स्पर्धेला सुरुवात झाली असून पहिले तीन दिवस महिला बॉक्सिंग पार पडल्यानंतर पुरुष बॉक्सिंग स्पर्धेमध्ये युवकांची मोठी चुरस पाहायला मिळाली. यामध्ये औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अमरावती, अकोला, धुळे, नंदुरबार, पुणे, मुंबई,सातारा, अशा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून हे स्पर्धक कणकवली मध्ये स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाले आहेत आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी देखील प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.