*कोकण Express*
*कणकवलीत श्रीधर नाईक उद्यानाचे भाजप आणि नंतर शिवसेनेकडून उद्घाटन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात बाधित झालेल्या कै. श्रीधर नाईक उद्यानाचे ७५ लाख रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले आहे. या उद्यानाचे लोकार्पण सकाळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते झाल्यानंतर दुपारी शिवसेनेकडून ही माजी खासदार तथा ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.एकाच गार्डनचे दोन्ही पक्षांकडून उद्घाटन केल्याने सेना भाजप मध्ये विकासाच्या श्रेय वादाची लढाई पुन्हा एकदा या निमित्ताने दिसून आली.
यावेळी कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते गौरीशंकर खोत, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, नीलम सावंत – पालव, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, बाळा भिसे, नागेंद्र परब, अमरसेन सावंत, जयभारत पालव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, नगरसेविका मानसी मुंज, उद्यानाचे ठेकेदार तथा भोसले इंडस्ट्रीजचे प्रताप भोसले, शहरप्रमुख शेखर राणे, सचिन आचरेकर, विनायक मेस्त्री, बाळू पालव, भूषण परुळेकर, प्रतीक्षा साटम, दिव्या साळगावकर, सुरेश मेस्त्री, लक्ष्मण लोके, विजय डामरे, विजय परब, महेश लोके, आत्माराम घाडी,आदी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.