*कोकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयात योग दिन साजरा*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
फोंडाघाट येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे आंतरराष्ट्रीय योग दिन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना व आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. योग दिनाला योगाची प्रात्यक्षिके शिकवण्यासाठी योगगुरू प्रा. डॉ. संतोष रायबोले उपस्थित होते. सुरुवातीला योगाची शरीर व मन यासाठी असणारी उपयुक्तता समजावून सांगून प्रात्यक्षिके करून दाखवली व करून घेतली. नियमित योगाने शरीर तंदुरुस्त तर होतेच पण मनही तंदुरुस्त राहते. दवाखाना आपल्यापासून दूर होतो आणि जीवन प्रसन्नतेने जगता येते. असे प्रतिपादन प्रा. डॉ. संतोष रायबोले यांनी केले.
प्रात्यक्षिकानंतर घेण्यात आलेल्या प्रबोधन वक्तव्यात बोलताना फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे संचालक, माजी कृषी सभापती माननीय श्री. संदेश पटेल म्हणाले की, योग दिनाच्या निमित्ताने असलेली विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली असुन योग करताना मला तंदुरुस्त वाटते . विद्यार्थ्यांनी नियमित योग केला पाहिजे. आपल्याला काय येते या बरोबरच आपण काय करतो हे सुद्धा महत्त्वाचे असते. इच्छाशक्तीने सर्व प्राप्त होते. महाविद्यालयीन जीवन जगत असताना उपक्रमशील राहिले पाहिजे. याच आठवणी भविष्यात स्मरणात राहतात.
त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बालाजी सुरवसे यांनी आपले महाविद्यालय उपक्रमशील आहे. तेथे नेहमी काही ना काही घडत असते. याचा विद्यार्थ्यांनी फायदा घेतला पाहिजे. विद्यार्थी सजग असला पाहिजे. असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार एनसीसी असोसिएट ऑफिसर डॉ. राज ताडेराव यांनी यांनी मांनले.
योग दिनाला महाविद्यालयाचा सर्व शिक्षक वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.