*कोकण Express*
*राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद कळसुली मतदारसंघात शिरवल गावात शेतकऱ्यांना जायफळाच्या रोपांचे वाटप*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त शिरवल गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघात, युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन सदस्य प्रफुल्ल सुद्रीक यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना जायफळाची झाडे वाटप करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांचे आभार मानत समाधान व्यक्त केलं.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस, भरत गांवकर, सत्यविजय परब, रोहन सुद्रीक, अक्षय घाडीगांवकर, लक्ष्मण गांवकर उपस्थित होते.