*कोकण Express*
*खारेपाटणमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या*
संदीप विलास मुसळे हा मसाले विक्रीचा आठवडा बाजार करून व्यवसाय करायचा तर त्याची दोन मुले व पत्नी माहेरी गेले असल्याचे समजते. मात्र आज सायंकाळी घरात कोण नाही हे लक्षात घेऊन आपल्या घराच्या टेरेसवर जाऊन येथील छपराच्या लोखंडी बारला लायलॉन दोरीने गळफास घेऊन संदीप यांनी आत्महत्या केली. ही घटना त्यांच्या कुटुंबातील माणसाच्या निदर्शनास येताच त्यांनी आजूबाजूच्या लोकांना माहिती दिली. त्याला तात्काळ खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचरासाठी आणण्यात आले.
मात्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ प्रिया वडाम यांनी तपसाअंती त्याला मृत घोषित केले. मयत संदीप यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत अधिक तपास खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस अधिकारी करीत आहेत. त्याच्या मागे त्याची पत्नी दोन मुलगे आई भाऊ भावजय असा परिवार आहे.