*कोकण Express*
*पेंडूर प्राथमिक शाळांमधून मोफत वह्या वाटपाचा शुभारंभ*
*युवा संदेश प्रतिष्ठान व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांचा पुढाकार*
*मालवण ः प्रतिनिधी*
युवा संदेश प्रतिष्ठान व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पेंडूर जिल्हा परिषद मतदार संघात संतोष साठविलकर यांच्या विशेष प्रयत्नातून प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ मालवण तालुक्यातील पेंडूर येथून करण्यात आला. यावेळी जिल्ह्यात सुमारे दीड लाख वह्या वाटप करण्यात येणार असल्याचा मानस असल्याचे गोट्या सावंत यांनी सांगितले. त्याचप्रमाणे गावागावात प्राथमिक शाळा यांच्या पटसंख्येत होणारी घट आणि त्याबद्दल एक गाव एक शाळा ही भविष्यातील असलेली गावाची गरज याबद्दल सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास संदेश उर्फ गोट्या सावंत, संतोष साठविलकर, सरपंच सुनिता मोरजकर, ग्रा. पं. सदस्य सुमित सावंत, आप्पा पटेल, सत्यवान परब, रविंद्र गावडे, सतीश पाटिल, शेखर फोंडेकर, साबाजी सावंत, पोलीस पाटील विश्वास मालवणकर, बिपिन परब, शैलेश परब, अश्विनी पेडणेकर, नेहा परब, अश्विनी परब, कृष्णा मांडकुलकर, अमित सावंत, आशिष आपटे, घनःश्याम राणे, रविंद्र चव्हाण, संदीप सावंत, न्हानू पेंडूरकर, संतोष हिंदळेकर तसेच सर्व शालेय समिती अध्यक्ष, सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व पालक उपस्थित होते.