*कोकण Express*
*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप*
मनसे माथाडी कामगार सेनेचे संयुक्त चिटणीस तथा कुडाळ संपर्क अध्यक्ष घनश्याम परब यांच्या पुढाकाराने कुडाळ तालुका मनसेच्या वतीने शालेय पिंगुळी सराफदारवाडी,धुरीटेम्बनगर,हरीजनवाडी, मुस्लिमवाडी तसेच नेरूर ठाकूरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. तसेच अंगणवाडी मधील लहान मुलांसाठी अंकलिपी पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे,कुडाळ सचिव राजेश टंगसाळी, उपतालुका अध्यक्ष दीपक गावडे, विभाग अध्यक्ष सुंदर गावडे,शाखाध्यक्ष वैभव धुरी,अक्षय जोशी आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते. मनसेचा वह्या वाटप उपक्रम पुढील संपूर्ण जून महिना कुडाळ तालुक्यामध्ये सुरु राहणार असल्याचे मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी यावेळी जाहीर केले.