*कोकण Express*
*फोंडाघाट न्यू इंग्लिश स्कूलचा 100% निकाल*
*अनुष्का गांधी प्रथम तर साईराज तावडे द्वितीय*
*फोंडाघाट ःःसंंजना हळदिवे *
दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेला कणकवली तालुक्यातील फोंडाघाट न्यू इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. या परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट प्रशालेचे एकूण विद्यार्थी 131 प्रविष्ट झाले होते, पैकी 131 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
कु. अनुष्का मनिष गांधी हिने ९९.२० टक्के प्राप्त करून विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकवला आहे.
तर साईराज अंकुश तावडे याने ९८.८० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, अथर्व प्रसाद पारकर ९८.२० टक्के तृतीय येण्याचा मान पटकवला. प्रशालेतील 39 विद्यार्थिनी 90 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सु.मा. सावंत, सेक्रेटरी चं.शा. लींग्रस, खजिनदार आ.मा. मर्ये, शालेय समितीचे चेअरमन द.दी. पवार, फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे संचालक मंडळ, पालक व ग्रामस्थ तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक एस.ए.सावंत, पर्यवेक्षक, महेश पेडणेकर, पारकर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन केले.