*कोकण Express*
*कणकवली विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे एस. एस. सी. परीक्षेत सुयश*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली च्या विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचा एस. एस. सी. परीक्षेचा निकाल ९८.९५% लागला असून स्नेहा मनोज मुसळे हिने ९८.२०% गुण मिळवत प्रशालेतून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर अनुष्का अमोल सावंत ९६.६०% गुण मिळवत द्वितीय आणि प्रतीक्षा राजेंद्र जाधव ९६.२०% गुण मिळवत तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. प्रेरणा सत्यवान तांबे आणि सर्वेश श्रीकृष्ण नानचे यांनी प्रत्येकी ९६.००% गुण मिळवत चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. तर ओम विनायक चव्हाण याने ९५.२०% गुण मिळवत पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांकडून अभिनंदन केले आहात आहे.