*कोकण Express*
*करंजे – नागवे -साकेडी पंचक्रोशी आदर्श विद्यालय करंजेचा १००टक्के निकाल*
*विशेष प्राविण्य १५ विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत ०९ जणांचा समावेश*
*गेली १५ वर्षे १००%निकालाची पंरपंरा याही वर्षी कायम*
*कासार्डे : संजय भोसले*
तांबे एज्यूकेशन सोसायटी संचलित , करंजे नागवे साकेडी पंचक्रोशी आदर्श विद्यालय करंजेचा मार्च २०२२ चा दहावीचा निकाल १०० % लागला असून यामध्ये प्रथम – कु. प्रेरणा सचिन खेडेकर – ९५.२० % , व्दितीय – कु. दिक्षा दिलीप मळये – ९२ . ०० % , तृतीय – कु. तन्वी संतोष मेस्त्री – ९०.६० % यांनी यश संपादन केले आहे . सर्व उतीर्ण विद्यार्थ्यांमध्ये विशेष प्राविण्य – १५ , प्रथम श्रेणी – ०९ , व्दितीय श्रेणी – ०१ असे प्राविण्य मिळवले आहे . गेली १५ वर्षे शाळेचा निकाल १०० % सातत्याने लागला असून प्रशालेने १००% निकालाची परंपरा टिकवून ठेवली आहे .
सर्व उत्तीर्ण विदयार्थ्यांचे संस्थाध्यक्ष शिक्षणमहर्षी प्रिं. आर . एल . तांबे सर , उपाध्यक्ष – अभय तांबे सर व सर्व विश्वस्त , सचिव – प्रदिप सर्पे , मुख्याध्यापक – श्री . एस . डी . चोडणकर , शाळा व्यवस्थापन व विकास समिती , पालक शिक्षक संघ , शालेय व्यवस्थापन समिती , पालक वर्ग , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे