कासार्डे हायस्कूलमध्ये पुष्पवृष्टी करून नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत

कासार्डे हायस्कूलमध्ये पुष्पवृष्टी करून नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत

*कोकण Express*

*कासार्डे हायस्कूलमध्ये पुष्पवृष्टी करून नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत..*

*कासार्डे:- संजय भोसले*

कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष सन २०२२/२३ यावर्षी नविन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून व गुलाबपुष्प देऊन शाळेत स्वागत करण्यात आले.
कोरोनाच्या सावटानंतर
तब्बल दोन वर्षांनंतर प्रथमच आज 15जुन रोजी राज्यात शाळेची घंटा वाजली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत.
बुधवारी कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे स्कुल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर, सदस्य रविंद्र पाताडे, विद्यालयाचे प्राचार्य एम.डी.खाड्ये, पर्यवेक्षक एन.सी.कुचेकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुष्पवृष्टी करून तसेच गुलाब पुष्प देऊन टाळ्यांच्या कडकडाटात नवगतांचे हार्दिक स्वागत केले.
दरम्यान इ.५वी मधील गंधार सुशांत मुणगेकर या विद्यार्थ्यांने आयटीएस परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावल्याबद्दल तसेच एसटीएस गुणवत्ता धारक अर्थव सत्यविजय सावंत व कु.वैदही मधुसूदन राणे यांचा तसेच इतर आयटीएस गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांचाही जिल्हा गुणवत्ता यादीत आल्याबद्ल मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
या अनोख्या पद्धतीने केलेल्या स्वागताने आणि सत्काराने नवीन विद्यार्थी खुपचं आनंदीत उत्साहित झालेली दिसून येत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!