*कोकण Express*
*नगराध्यक्ष नलावडे यांचा निर्णय नैतिकतेला धरून अन् स्वागतार्ह…!*
*नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी नगराध्यक्षांच्या निर्णयाचे केले स्वागत…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कै. श्रीधर नाईक उद्यानाचे लोकार्पण सोहळा 22 जूनला होणार आहे. हा लोकार्पण सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार असल्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी जाहिर केले. नलावडे यांचा हा निर्णय नैतिकतेला धरून असून स्वागतार्ह आहे, असे नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी सांगितले.
दिलेल्या प्रसिध्दी पत्रकार म्हटले की,
कै. श्रीधर नाईक उद्यान चे लोकार्पण सोहळा 22 जून ला होणार आहे व काल नगरसेवक कन्हैया पारकर यांनी नारायण राणे यांच्या नावाला विरोध केल्यानंतर आता नव्याने सुधारणा करून तो सोहळा केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांच्या हस्ते न होता तो आता पालकमंत्री श्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी जाहीर केले आहे.खरोखरच श्री.नलावडे यांचा हा निर्णय नैतिकतेला धरून आहे आणि स्वागतार्ह आहे नलावडे पालकमंत्री यांच्या बरोबर आपले संबंध सांभाळायला जातात तसेच ते राणे कुटुंबियांना देखील सांभाळायला जातात अन् नाईक कुटुंबाशीही संबंध सांभाळत आहेत.या व्यापात त्यांची कसरत होतेय. यामुळेच ते गडबडतात आणि ते सहाजिकच आहे. कारण परस्पर विरोधी नेत्यांची आपल्या हितासाठी त्यांची मन सांभाळणे काही खाऊ नाही ते काही असेल मात्र दुसरा कोणताही विचार न करता त्यांनी सुधारणा केली पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.याचे स्वागत करत त्याचा निर्णय योग्यच असल्याचे ही श्री.नार्वेकर यांनी सांगितले.