*कोकण Express*
*युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित आंबे खाण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*प्रथमेश सुतार, सिद्धेश गावकर प्रथम, १२० विद्यार्थ्यांचा सहभाग*
*कणकवली ः प्रतिनिधी*
युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ-सांगवे यांच्या वतीने सकाळी कनेडी बाजारपेठ येथे आंबे खाण्याचा स्पर्धेला सुरुवात झाली. सिंधुदुर्गात या पहिल्या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सात वर्षाखालील व पंधरा वर्षाखालील मुलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. कोकणचा राजा हापूस आंबा खाण्यासाठी सर्वजण आतुर झालेले असतात आणि याच आतुरता त्या क्षणाला जर मनसोक्त आंबे खायला मिळाले तर प्रत्येक जण आनंदून आणि भारावून जाईल अशाच पद्धतीचा उपक्रम आज युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ – सांगळे यांच्यावतीने कनेडी बाजारपेठेत ते आयोजन करण्यात आला होता. यामध्ये सात वर्षाखालील व पंधरा वर्षाखालील अशा दोन गटांमध्ये आंबे खाण्याची स्पर्धा ठेवली होती. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते बक्षीस व पार पडला. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
लहान गट – प्रथम – प्रथमेश संतोष सुतार,द्वितीय – ओम सचिन राणे,तृतीय – श्रेयश भरत दारिस्तेकर
मोठा गट प्रथम – सिद्धेश महेश गावकर,द्वितीय रिद्धी रविकांत पेंडूरकर,तृतीय ऋतुराज दीपक देसाई यांनी यश मिळवले.
सर्व विजेते व उपविजेत्या विद्यार्थ्यांना शालेयपयोगी साहित्य वितरण करण्यात आले.
त्यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, विजय भोगटे, किरण गावकर, राजश्री पवार, महेश पवार, मिलिंद डोंगरे, म्हापणकार, नांदगावकर, राजू पेडणेकर , सरपंच, उपसरपंच ग्रामस्थांसह युवा संदेश प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बहुतांश विद्यार्थ्यांनी आंबे खानण्याचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी बोलताना सांगितले की, संदेश सावंत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आम्ही येथे आयोजित केला आहे. आणि आपल्या दोन्ही मतदारसंघांमध्ये उदंड प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला. 120 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.कोकणचा राजा हापूस आंबा खाण्याचा आनंद या मुलांनी आज लुटला आहे. कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचे आभार मानते. जिल्ह्यामध्ये पहिलीच ही स्पर्धा असून, या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केलं असल्याचं माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी सांगितले.