*कोकण Express*
*एज्यूकेशनल अॅडव्हायजर सदाशिव पांचाळ यांचा बौद्धिक क्षमतेवर आधारित खेड येथे 1 हजारावा प्रयोग*
*कासार्डे : संजय भोसले*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील एज्यूकेशनल अॅडव्हायजर सदाशिव पांचाळ यांचा मुलांच्या बौध्दिक क्षमता वाढवणारा १००० वा कार्यक्रम खेड (रत्नागिरी) येथील एल.टी.टी.इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्यूनिअर कॉलेज येथे ९ जून २०२२ रोजी होत आहे. सदाशिव पांचाळ हे २००३ पासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून त्यांचे सिंधुदुर्गातच नव्हे तर रत्नागिरी, रायगड, मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव आणि गोवा येथे ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षक यांना मार्गदर्शन करणारे अनेक कार्यक्रम त्यांनी केले आहेत.
जेष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथे एक हजार मुलांना एकत्र मार्गदर्शन करण्याची संधीही पांचाळ यांना मिळाली आहे. झी मराठीच्या ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर ही पांचाळ यांनी आपली कन्या मृण्मयी हिच्यासह स्मरणशक्तीची प्रात्यक्षिके सादर केली आहेत. यावेळी मराठी सुपरस्टार भरत जाधव, नृत्यांगना सुकन्या काळण, देवेंद्र पेम, कमलाकर सातपुते, सई तेलंग, कांचन पगारे, तसेच ‘हवा येऊ द्या’ ची संपूर्ण टिम उपस्थित होती.
प्राथमिक शाळेपासून सिनिअर कॉलेज् पर्यंतच्या हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पांचाळ यांच्या कार्यक्रमांमध्ये अनेक अभियंते, अनेक डॉक्टर्स, सर्व शिक्षा अभियानाचे अधिकारी, शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख यांनी उपस्थिती लावलेली आहे.
हिमाचल प्रदेशचे विद्यमान राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, गोव्याचे सर्वशिक्षा अभियान प्रमुख पांडुरंग नाडकर्णी यांनीही कार्यशाळेत उपस्थिती लावल्यामुळेच पांचाळ यांचा कार्यक्रम गोव्यात मोठा झाला. गोव्यातील माजी आमदार प्रसाद गावकर यांनी आपल्या मतदार संघातील १२ शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पांचाळ यांचे एकूण सहा कार्यक्रम आयोजित केले होते. माजी आमदार नरेश सावळा यांनी ही पांचाळ यांचे दोन मोठे कार्यक्रम आयोजित केले होते. यापैकी एक कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी तर एक कार्यक्रम आपल्या कार्यकर्त्यांसाठी होता. यावेळी डॉ. दयानंद राव यांनी पांचाळ यांच्या कार्यशाळेचे भरभरून कौतुक केले होते.
नगरसेवक अरविंद शिंदे यांनीही पांचाळ यांच्या कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. देवरूख रत्नागिरी येथे माजी आमदार सुभाष बने यांनी इंटरनॅशनल हायस्कूल मध्ये पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी संयुक्त कार्यशाळा आयोजित केली होती.