ओसरगाव टोलनाका ऑफीसवर कोकण पर्यटन विकास महमंडळ उपाध्यक्ष संदेश पारकर आणि माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांची धडक

ओसरगाव टोलनाका ऑफीसवर कोकण पर्यटन विकास महमंडळ उपाध्यक्ष संदेश पारकर आणि माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांची धडक

*कोकण Express*

*ओसरगाव टोलनाका ऑफीसवर कोकण पर्यटन विकास महमंडळ उपाध्यक्ष संदेश पारकर आणि माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांची धडक*

*”सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला टोलमाफी न मिळाल्यास शिवसेना स्टाईलने टोलवसुली बंद करण्यार”*

*”हायवेची सर्व कामे मार्गी लागत नाही तोपर्यंत टोलवसुली सुरु होऊ देणार नाही”*

*-संदेश पारकर, सतिश सावंत यांचा ईशारा*

*टोल नाक्यावर स्थानिकांना रोजगार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना संपूर्ण टोल माफी मिळत नाही आणि जिल्ह्यातील महामार्गाची निलंबित कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ओसरगाव येथील टोल नाका चालू करू देणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेत कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष संदेश पारकर व माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी ओसरगाव येथील हायवे टोल कार्यालयावर धडक दिली.*
*महामार्गाची कामे अपूर्ण असताना हायवे कंपनीने ओसरगाव येथील टोल सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोकण पर्यटन विकास मामंडळ उपाध्यक्ष संदेश पारकर व शिवसेना नेते सतिश सावंत यांनी आज MDK टोल वेज कंपनीचे व्यवस्थापक अमोल कळसकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांच्यासह ओसरगाव सरपंच प्रमोद कावले शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.*
*कणकवली शहराचे आरओडब्लूचे काम अद्याप निश्चित झालेले नसुन अनधिकृत बांधकामांचा प्रश्न अजुनही प्रलंबित आहे. टोल नाक्याच्या दोन्ही बाजूंनी सिंधुदुर्ग मधील वाहनांना फ्रीवे रस्ता ठेवावा अशी मागणी देखील श्री.पारकर व श्री.सावंत यांनी केली.*
*खारेपाटण ते झाराप हा केवळ 70 ते 80 किलोमीटर चा महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे तर टोलनाक्याच्या दोन्ही बाजूला चार चार तालुके आहेत येथील लोकांना जिल्हाभरात सातत्याने आपल्या कामासाठी येजा करावी लागते त्यामुळे एम एच 07 असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना पूर्णपणे टोल माफी याठिकाणी देण्यात यावी अशी मागणी पारकर यांनी यावेळी केली आहे.*
*जिल्ह्यात अद्यापही महामार्गाची कामे रखडलेली आहेत नांदगाव येथे सर्विस रस्त्याचे काम झालेले नाही कणकवली मध्ये नाईक पेट्रोल पंप ते गडनदी पुलापर्यंत एका लेनचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही पावसाळ्यात महामार्गावर ठिकठीकाणी पाणी भरते स्ट्रीट लाईट चे काम देखील अर्धवट आहे महामार्गाच्या पुलावर भरणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा केला गेलेला नाही पावसाळ्यात या पुलावरून वाहणारे पाणी अक्षरशः धबधब्यासारखे वाहते त्यामुळे पुलाखालील सर्विस मार्गावरून जाणाऱ्या लोकांच्या अंगावर हे पाणी कोसळते त्यामुळे या पाण्याचा योग्य निचरा करण्यात यावा अशा मागण्याही संदेश पारकर यांनी यावेळी केल्या.*
*महामार्गासाठी संपादित केलेल्या जागेबाबत प्रकल्पग्रस्तांचे निवाडे अद्यापही पूर्ण झालेले नाहीत काही प्रकल्पग्रस्तांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही टोलचा कार्यालयासाठी संपादित करण्यात आलेल्या जागेचा मोबदला अद्यापही जमीन मालकाला मिळालेला नाही त्यामुळे ही सर्व कामे जोपर्यंत मार्गी लागत नाहीत तोपर्यंत टोल नाका सुरू करून देणार नाही अशी भूमिका यावेळी संदेश पारकर यांनी मांडली आहे. या टोल नाक्यावर स्थानिक लोकांना रोजगार देण्यात यावा कुशल आणि अकुशल कामगार हे स्थानिक पातळीवरील असच घेतले जावेत असे देखील संदेश पारकर यांनी सुनावले.*
*ओरोस येथे जिल्ह्यातील महत्वाची शासकीय कार्यालय आहेत. जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हा न्यायालय जिल्हा रुग्णालय अशा शासकीय कार्यालयांमध्ये देवगड कणकवली वैभववाडी या तालुक्यातील लोकांना सातत्याने येता करावी लागते त्यामुळे या वाहनधारकांनी रोजच टोल भरायचा का असा प्रश्न करत संदेश पारकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना संपूर्ण टोल माफी मिळाली पाहिजे अन्यथा आम्ही गप्प बसणार नाहीत अशी भूमिका देखील मांडले आहे.*
*टोल वसुली सुरु होण्यापूर्वी सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, महसुल अधिकारी, हायवे अधिकारी, टोल वसुली अधिकारी यांची प्रथम टोलवसुली संदर्भात बैठक होऊन मगच टोलवसुली विषयी निर्णय घेणेत यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. अन्यथा शिवसेनेतर्फे मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संदेश पारकर आणि सतिश सावंत यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!