*कोकण Express*
*ओसरगाव टोलनाक्यावर टोल वसुली, कामे मात्र अपूर्णच*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना टोल माफीसाठी लढा उभारण्याची गरज*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
मुबंई गोवा महामार्ग क्रमांक ६६ वर अखेर ओसरगाव येथे टोल वसुली सुरु करण्यात आली आहे. महामार्ग गटारे,सर्व्हिस रस्ते व सुविधा अद्यापही अपूर्ण आहेत.महामार्ग ठेकेदाराने स्वतःच्या फायद्यासाठी आपली टोल धाड सुरु केल्याने वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे. त्याठिकाणी कुठली कंपनी टोलवसुली करते याबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता टोलवसुली केल्यामुळे यावेळी संघर्ष होताना दिसत आहे. या स्टॉलवर स्थानिकांना वगळण्यात येणार का? जर सरसकट टोलवसुली झाल्यास जनआंदोलन उभारण्याची गरज असल्याचं मत नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.
ओसरगाव येथील टोलनाक्यावर टोलवसुली २५ पासून सुरु केली. टोलनाका सुरु झाला आहे, फास्ट टॅग बंधनकारक आहे अन्यथा दुप्पट टोलवसुली केली जाणार अशी पत्रके वाटप करण्यात येत आहेत. महामार्गाचे काम अपूर्ण स्तन टोलवसुली करता येते का ? वाहनचालकांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधांचा थांगपत्ता नाही आणि टोलवसुलीचा ठेका मंजूर करून प्रत्यक्षात टोलवसुलीला हिरवा कंदील दाखविण्यामागे नेमका कोणाचा आर्थिक फायदा आणि आर्थिक साटेलोटे आहेत ? टोलनाका सुरू करण्यासाठीचे नियम पूर्ण झालेत काय ? याबाबत लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लोकांना सांगितले पाहिजे.
मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव मध्ये होत असलेल्या टोलवसुली तून स्थानिकांना वगळण्याची गरज आहे. त्यासाठी सेवाभावी संस्थांनी एकत्र येत टोलमुक्तीचा लढा उभारण्याची पाहिजे. अन्यथा या टोल वसुली तून स्थानिकांना विनाकारण भुर्दंड मोठ्या प्रमाणात बसणार आहे. स्थानिक पालकमंत्री, आमदार,खासदार यांनी देखील नागरिकांच्या हिताचे धोरण प्रशासनाच्या माध्यमातून जाहीर करावे, अशी मागणी देखील होत आहे.