शिवसेनेच्या वतीने राज्यसभा निवडणुकीसाठी संजय राऊत व संजय पवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल

शिवसेनेच्या वतीने राज्यसभा निवडणुकीसाठी संजय राऊत व संजय पवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल

*कोकण Express*

*शिवसेनेच्या वतीने राज्यसभा निवडणुकीसाठी संजय राऊत व संजय पवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल*

शिवसेनेच्या वतीने राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्वप्रथम शिवसेना विधानभवन कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत,खासदार अरविंद सावंत,विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे,कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक आदीसह लोकसभा सदस्य व विधानसभा सदस्य उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची खा. विनायक राऊत, नीलम गोऱ्हे,आ. वैभव नाईक यांनी सदिच्छा भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!