*कोकण Express*
*नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रस्त्यासाठी उपाययोजनेसाठी गती….!*
*पंचक्रोशीतील नागरिकांच्या उपोषणानंतर हालचाली सुरू…!*
*महामार्ग अधिकाऱ्यांनी पुन्हा सर्व्हिस रस्त्यांची केली पाहणी..!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रस्त्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी साखळी उपोषण प्रांतकार्यालयासमोर छेडले.त्यावर प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी सर्व्हिस रस्ता खुला करण्यासाठी आमचे गतीने काम सुरु आहे.नलावडे कुटूंबियांना लेखी पत्र आजच देत आहोत,की वाढीस जमीन नोटीस बजावली आहे, आता बांधकाम मोबदल्याबद्दल निवाडा तयार करुन महामार्ग प्राधिकरणला पाठवला असून मंजुरी मिळताच दुसऱ्या दिवशी नोटीस बजावली जाईल, असे सांगत मागणी बद्दल लेखी आश्वासन प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी नांदगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांना दिल्यावर साखळी उपोषण स्थगित करण्यात आले आहे.तसेच महामार्ग प्राधिकरण कार्यकारी अभियंता श्री.शिवनिवार व कुमावत हे दुपार नंतर सर्व्हिस रस्ता चालू करण्याबाबत प्रत्यक्ष पाहणी ग्रामस्थांना घेऊन करणार असल्याचे सांगितले होते.
या अनुषंगाने आज सायंकाळी ४.३० वाजता महामार्ग प्राधिकरण कार्यकारी अभियंता श्री.शिवनिवार व कुमावत तसेच केसीसी ठेकेदार कंपनीचे श्री.पांडे यांनी सर्व्हिस रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून काय उपाययोजना करता येतील का? याबाबत आढावा घेतला आहे.
यावेळी नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर,सामजिक कार्यकर्ते भाई मोरजकर, उपसरपंच निरज मोरये,असलदे सरपंच पंढरी वायगंणकर, कमलेश पाटील,राजू खोत आदी उपस्थित होते.