*कोकण Express*
*ज्येष्ठांच्या स्वप्नाचे पानिपत करणाऱ्या प्रशासनाचा निषेध*
*15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर छेडणार आंदोलन*
*ज्येष्ठ नागरिक संघाचे दादाकडे कुडतरकर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या व मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने व ज्येष्ठ नागरिकांच्या स्वप्नांचे प्रशासनाने पानिपत केल्याने 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे दादा कुडतरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री कुडतरकर यांनी म्हटले आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या 24 मे रोजी च्या बैठकीचे पत्र 23 मे 22 रोजी नेहमीप्रमाणेच सायंकाळी उशिरा प्राप्त झाले. त्यामुळे व पूर्वनियोजित कार्यक्रम व उपक्रमामुळे मी व आमच्या संघटनेचे सदस्य उपस्थित राहू शकत नाही. यापूर्वी आयोजित केलेल्या बैठकीला जिल्हाधिकारी अन निमंत्रित पदाधिकारी एकदाही उपस्थित राहिलेले नाहीत. निमंत्रण देऊनही जेष्ठांची दखल घेतलेली नाही.9 जुलै 2018 च्या शासन निर्णयानुसार कोणतेच धोरण राबविलेले नाही. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. जेष्ठांची अवलेहना आपण सर्वानी केली असून, जेष्ठांच्या स्वप्नांचे पानिपत केले आहे. प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध म्हणून म्हणून येत्या 15 ऑगस्ट 2022 स्वातंत्र दिनी शेकडो जेष्ठ नागरिकांसह उपोषण करणार आहोत असा इशारा श्री कुडतरकर यांनी दिला आहे.