*कोकण Express*
*पारंपारीक मच्छीमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू…*
*नितेश राणेंचे आश्वासन; कुणकेश्वर येथील रापण मच्छीमारांची घेतली भेट…*
*देवगड ः प्रतिनिधी*
पारंपारीक मच्छीमारांच्या पाठीशी आपण कायम उभे राहू,तसेच त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील,असा विश्वास आमदार तथा भाजपाचे नेते नितेश राणे यांनी आज येथे व्यक्त केला.श्री.राणे यांनी कुणकेश्वर येथिल रापण मच्छीमारांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.यावेळी त्यांना भेडसावणार्या समस्या सोडविण्यासाठी आपण केंद्र शासनाच्या माध्यमातून निश्चितच प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी पंचायत समिती सभापती सुनील पारकर,जिल्हा परिषद सदस्या सावी लोके, पंचायत समिती सदस्य सौ. कदम, भाजप देवगड तालुका मंडल अध्यक्ष संतोष किंजवडेकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे, जयदेव कदम, प्रकाश राणे, भाजप पदाधिकारी संदीप साटम, शैलेश लोके, श्री. खवळे तसेच इतर पदाधिकारी व रापण मच्छिमार उपस्थित होते.