सिंधुदूर्ग जिल्ह्यातील प्रलंबित शेती कृषी कनेक्शन साठी जिल्हा नियोजन मधून निधी देण्याची निवेदनाद्वारे केली मागणी

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील प्रलंबित शेती कृषी कनेक्शन साठी जिल्हा नियोजन मधून निधी देण्याची निवेदनाद्वारे केली मागणी

*कोकण Express*

*सिंधुदूर्ग जिल्ह्यातील प्रलंबित शेती कृषी कनेक्शन साठी जिल्हा नियोजन मधून निधी देण्याची निवेदनाद्वारे केली मागणी*

*माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत*

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील प्रलंबित शेती कृषी कनेक्शन साठी जिल्हा नियोजन मधून निधी देण्याची मागणी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी मा. नाम. श्री. उदयजी सामंत पालकमंत्री, सिंधुदूर्ग जिल्हा यांच्याकडे आज केली. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ली., कडे देवगड, कणकवली, मालवण तालुक्यातील नवीन शेती कृषी कनेक्शन मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. नवीन शेती कृषी कनेक्शन साठी 42 लाख निधीची आवश्यकता आहे. MSEB  कडे कृषी आकस्मिक निधी (SEF FUND) पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे शेतीची कृषी कनेक्शन प्रलंबित राहतात. त्यासाठी जिल्हा नियोजन निधी म्हणून खास बाब म्हणून निधी देण्याची मा. पालकमंत्री यांनी आदेश दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!