*कोकण Express*
*कणकवली शाळा नं ५च्या इमारत दुरूस्तीसाठी निधी मिळावा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जि. प. प्राथमिक कणकवली शाळा नं ५ च्या इमारतीच्या दुरूस्तीसाठी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत श्रीधर नाईक यांनी पालकमंत्री नाम.उदय सामंत यांना लेखी निवेदन दिले आहे. कणकवली नगरपंचायत क्षेत्रातील जळकेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ५ या शाळेच्या इमारतीचे छप्पर कोसळले असून त्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना बसवणे हे धोक्याचे आहे.
सदर शाळेच्या इमारतीची सुशांत नाईक यांनी उपकार्यकरी अभियंता सुतार यांच्यासोबत पाहणी केली आहे. सदरची शाळा जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 च्या आराखड्यात समाविष्ट आहे. तरी शाळा इमारत दुरुस्तीसाठी २० लाख एवढा निधी तातडीने विशेष बाब म्हणून मंजूर करावा अशा विनंतीचे निवेदन सुशांत नाईक यांनी दिले आहे.