*कोकण Express*
*फोंडाघाट मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश…!*
*आम.नितेश राणे यांनी केले प्रवेशकर्त्यांचे स्वागत…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
तालुक्यातील फोंडाघाट मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्ष प्रवेश केला.भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीत गणेश निवासस्थानी हा पक्ष प्रवेश झाला.राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे गोंधळी समाजाचे कार्यकर्ते अशा कार्यकर्त्यांनी हा पक्ष प्रवेश केला.
यावेळी रुपेश निकम, अनंत निकम, मंगेश निकम, लक्ष्मण निकम, कृष्णा निकम, सुनील निकम, निलेश गजोबा, दिनेश होळकर,नितेश गजोबा,रवींद्र होळकर प्रकाश सत्तार, अरुण निकम ,अनंत गजोबा,अनिल गजोबा,अशा कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके यांनी पुढाकार घेऊन हा पक्षप्रवेश घडवून आणला. आमदार नितेश राणे यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे भाजपाची शाल घालून स्वागत केले.यावेळी अशोक भाऊ राणे, अक्षय राणे सुद्धा उपस्थित होते.