*कोकण Express*
*चार वर्षातील आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे उद्या वितरण*
*ओरोस ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने प्रतिवर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी यांना आदर्श ग्रामसेवक म्हणून पुरस्कार वितरित केले जातात. कुडाळ येथील नवीन एसटी स्टॅण्ड येथे सुरू असलेल्या कृषी, पशु-पक्षी प्रदर्शनमध्ये २०१७-१८ ते २०२०-२१ या चार वर्षातील जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांचे वितरण सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे.
यामध्ये एकूण ३२ ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी दिली आहे.