*कोकण Express*
*धम्म चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी युवापिढीची*
*बुद्धविचारांचे मार्गदर्शक सुशील मंचेकर; खांबाळे येथे संयुक्त जयंती महोत्सव*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे आपणाला समानता प्राप्त झाली आहे. आणि त्यामुळेच सर्वजन सन्मानाने वावरत आहोत. बाबासाहेबांनी दिलेली धम्म चळवळ पुढे नेण्यासाठी आजच्या युवापिढी ची पूर्णपणे जबाबदारी आहे. याकरिता समाजात निरंतर जागृती केली पाहिजे. बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविले पाहिजे. बाबासाहेबांची नुसती जयंती साजरी न करता त्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहु महाराज यांची जयंती साजरी करून त्यांचे विचार समाजात पसरविण्याचे काम केले पाहिजे. असे प्रतिपादन खांबाळे येथे आयोजित संयुक्त जयंती महोत्सवात बुद्धविचारांचे मार्गदर्शक सुशील मंचेकर यांनी केले.
खांबाळे बौद्ध विकास मंडळ आयोजित संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रम बौध्दवाडी या ठिकाणी पहिल्या दिवसाच्या उद्घाटन सत्राच्या सुरुवातीला बौध्दवाडी नामफलकाचे अनावर सोहळा मुंबईचे माजी सचिव भगवान कांबळे व मुंबई अध्यक्ष कृष्णा कांबळे यांचे शुभहस्ते संपन्न झाला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार व दिपप्रज्वलन करून बुद्धपूजा पाठ घेण्यात आला.
या सोहळ्याचे औचित्य साधुन मंडळाच्या जडणघडणीत ज्यांनी मोलाचे सहकार्य केले अशा जेष्ठांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याचबरोबर शैक्षणिक व इतर क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थी व व्यक्तींना मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके, वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ ग्रामीण सरचिटणीस रविंद्र पवार, सामाजिक कार्यकर्ते डॉ. रविंद्र जाधव, माजी सभापती शुभांगी पवार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी विचारमंचावर खांबाळे सरपंच गौरी पवार, उपसरपंच गणेश पवार, ग्रामपंचायत सदस्य प्राजक्ता कदम, दर्शना मोरे, मुंबई अध्यक्ष कृष्णा कांबळे, माजी अध्यक्ष केशव चि. कांबळे, मुंबईचे माजी सचिव भगवान कांबळे, डॉ. सुरेखा जाधव, ग्रामीण अध्यक्ष अमृत कांबळे, प्रसिध्द भजनी बुवा संजय पवार, बार्टी चे समतादूत राजू दीनदयाळ, ग्रा.पं. पाणी कर्मचारी अंबाजी पवार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई सरचिटणीस महेंद्र कांबळे, प्रास्ताविक प्रभाकर कांबळे व आभार ग्रामीण सरचिटणीस मंगेश कांबळे यांनी मानले.