*कोकण Express*
*छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त किल्ले विजयदूर्ग आणि रामगड येथे स्वच्छता मोहीम*
*कासार्डे:संजय भोसले*
गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त किल्ले विजयदूर्ग आणि रामगड येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेमध्ये किल्ले विजयदूर्ग येथील खलबत खाण्या समोरील बाजु, तटबंदीवरील वाढलेली झाडे झुडपे भुयारी मार्ग, आई भवानी मंदिरा समोरील आणि मागील बाजु वाढलेली गवत झुडूप काढून स्वच्छ करण्यात आले.
तसेच किल्ले रामगड येथे 16-5-22 रोजी होळीचा दरवाजा, गणेश मंदिरा बाहेर चा परीसर,तटबंदीवरील वाढलेली झाडे झुडपे बुरूज स्वछ करण्यात आले. छत्रपतींचे गड किल्ले हे मनाला शक्ती उर्जा देणाऱ्या वास्तू आहेत. यांचे जतन, संवर्धन, संरक्षण झाले पाहिजे. ज्यामुळे पुढील येणाऱ्या पिढीला हा इतिहास समजू शकेल. व या इतिहासामधून प्रेरणा भेटेल याच भावनेतून गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य महिन्यातून १ दिवस महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यावर जाऊन अशा विविध स्वच्छता मोहीमा राबण्याचे काम गेली अनेक वर्षांपासून सातत्याने करत आहे.
या मोहीमेचे आयोजन कोकण विभाग अध्यक्ष शुभम रानम , सपंर्क प्रमुख शुभम फाटक, अभिजीत तिर्लोटकर यांनी केले. या मोहिमेमध्ये, विक्रांत मोरये,सतीष राणम,विनायक कुडकर,राजेश काळे,अकाश राणम,रघुनाथ राणम,पंकज पुजारी,अनिकेत घाडी,नितीन नारकर,चेतन गुरव,शैलश चव्हाण,शिध्देश चव्हाण,संदीप चव्हाण,सुरेद्र चव्हाण,विकास राणम,सुशांत लांजवल,धीरज राणम,प्रतीक राणम,अतुल कुडकर,पंकज गुरव,अजिंक्य पवार, शिध्देश गुरव,शुभम गुरव,सुरज पाटील,अनिकेत कुडकर, सुरज राणम,गुरुनाथ काळे,अनिकेत तोरसकर,विकास राणम असे 40 दुर्ग सेवक उपस्थितीत होते. या मोहीमेला स्थानिक नागरिकांचे चांगले सहकार्य लाभले.