अखेर कणकवली-नरडवे मार्गावरील रेल्वे ब्रीज खालील रस्ता विजेच्या प्रकाशाने झगमगला

अखेर कणकवली-नरडवे मार्गावरील रेल्वे ब्रीज खालील रस्ता विजेच्या प्रकाशाने झगमगला

*कोकण Express*

*अखेर कणकवली-नरडवे मार्गावरील रेल्वे ब्रीज खालील रस्ता विजेच्या प्रकाशाने झगमगला*

*ह्युमन राईट असोशिएशनचे जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांच्या प्रयत्नाला यश*

*कासार्डे:संजय भोसले*

अखेर कणकवली-नरडवे मार्गावरील रेल्वे ब्रीज खाली नगरपंचायतीने स्ट्रीट लाईट लावल्याने ब्रीज खालील परिसर रात्रीचा प्रकाशमय झाला.याबाबत ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांनी मागणी केली होती.

कणकवली-नरडवे मार्गावरील रेल्वे ब्रीज खाली रात्रीचे अंधाराचे साम्राज्य असल्याने रात्री येणाऱ्या जाणाऱ्या पादचारी व प्रवाशांची खूप गैरसोय होत होती.तसेच परप्रांतीय लोकांच्या सततच्या वर्दळीमुळे काळोखाचा गैरफायदा घेऊन स्थानिक नागरीकांना कोणताही अनुचित प्रकार होण्याचा धोका निर्माण झाला होता.त्या ब्रीज खाली नगरपंचायतीने तातडीने स्ट्रीट लाईट बसविण्याची मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांनी लेखी निवेदनाद्वारे कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष समीर नलावडे लक्ष वेधले होते.

अखेर सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या स्ट्रीट लाईटच्या तातडीच्या मागणीची दखल कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी घेऊन कणकवली येथील रेल्वे ब्रीज खाली नवीन स्ट्रीट लाईटचे ब्रॅकेट बसवून स्ट्रीट लाईटची वीज जोडणी करण्यात आली.त्यामुळे रेल्वे ब्रीज खालील परिसरात रात्रीचे काळोखाचे साम्राज्य जाऊन परिसर प्रकाशमय झाला आहे.त्यामुळे नेहमी पायी चालत येणाऱ्या जाणाऱ्यांची प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.

कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मागणीची तातडीने दखल घेऊन त्याची पुर्तता केल्याबद्दल ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे अभिनंदन करुन धन्यवाद दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!