*कोकण Express*
*नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कणकवली शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कणकवली शहरातील विविध विकास कामांची भूमिपूजन आज सोमवारी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने कणकवली कनकनगर येथे परबवाडी गणपती साण्याचे बांधकाम करणे या कामाकरिता 44 लाख 95 हजार 948 चा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले. गेली अनेक वर्ष या भागातील नागरिकांची हे काम करण्याची मागणी होती. अखेर या कामाकरिता निधी मंजूर झाल्यानंतर आज या भागातील नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात गड नदीपात्रात गणपती विसर्जन करणे या भागातील लोकांना सोपे होणार आहे. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेविका मेघा गांगण, मेघा सावंत, नगरसेवक रवींद्र गायकवाड, ऍड. विराज भोसले, प्रतीक्षा सावंत, शिशिर परुळेकर, शिवाजी परब, बाळा पाटील, बाळा सावंत, माजी नगरसेवक बंडू गांगण, सुरेश परब, सचिन सरंगल, विठ्ठल परब, अनंत परब, शैलेंद्र परब, राजा परब, रुपल परब, राजेश चव्हाण, अमोल परब, दीपक सावंत, रमेश परब, धोंडू परब, हरी परब, बबलू सारंगले, संतोष सावंत, सत्यवान परब, स्वप्नील परब, वंदना कामतेकर, विशाल परब, सिद्धेश परब, जावेद शेख, प्रकाश परब, दादा परब, संतोष परब, दत्ता परब आणि सर्व परबवाडी शिवाजीनगर मधील कार्यकर्ते यांच्यासह अनेक नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.