दारुम येथे बिबट्याचे कातडे घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी केले जेरबंद

दारुम येथे बिबट्याचे कातडे घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी केले जेरबंद

*कोकण Express*

*दारुम येथे बिबट्याचे कातडे घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी केले जेरबंद*

*दारुम माळवाडी येथे स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई;८ लाखांच्या किंमतीचे कातडे आढल्याने खळबळ…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला वन्य प्राण्याची शिकार व अवयवांची बेकायदेशिर विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती.कासार्डे ते पडेल कॅन्टीन जाणारे रोडवर गाव दारुम येथून होंडा शाईन मोटार सायकल वर दोन इसम बिबटया या प्राण्याचे कातडे घेऊन येणार असल्याची टीप मिळाली होती. त्यानुसार पोलिसानी सापळा रचत वेगवेगळ्या ठिकाणी पथके ठेवली होती. अखेर दारुम , माळवाडी येथे दोन आरोपी मोटरसायकल वरुन बिबट्या या वन्य प्राण्यांचे कातडे १४ मे रोजी ३ वाजता घेऊन जात असताना आढळले आहेत.तब्बल ८ लाख किंमतीचे हे कातडे असल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शासनाने सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेला असल्याने , जिल्हयाचे पर्यटनदृष्टया महत्व वाढलेले आहे . जिल्हयामध्ये वनक्षेत्राची वाढ होवून वन्यप्राणी सुरक्षीत रहावे या करीता शासनाच्या संबंधीत विभागामार्फत सतत प्रयत्न सुरु आहेत . परंतु काही समाज विघातक व्यक्ती स्वतःच्या आर्थीक लाभासाठी वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस व इतर अवयवांची बेकायदेशिरपणे विक्री करतात . वन्य प्राण्याची शिकार व अवयवांची बेकायदेशिर विक्री होऊ नये याकरीता वन व पोलीस विभाग प्रयत्नशिल आहे .

सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या व्यक्तींवर पाळत ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सिधुदुर्ग पोलीसांना दिलेले होते . त्या आदेशान्वये अपर पोलीस अधिक्षकनितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांनी खालीलप्रमाणे सापळा रचून वन्य प्राण्याचे कातडे हस्तगत करुन तस्करी रोखण्यात यश मिळविलेले आहे .

पोलीस पथकात कासार्डे ते पडेल कॅन्टीग जाणाऱ्या रोडवर दारुम , माळवाडी येथे सापळा लावला त्यात दोन इसम एका काळ्या रंगाच्या होंडा शाईन मोटार सायकलवरून येताना दिसले . त्यांना थांबवून पोलिसांनी चौकशी केली असता किलतानाच्या पिशवीची त्यामध्ये रु . ८,००,००० रुपये किमतीचे एक बिबटया या वन्य प्राण्याचे कातडे मिळून आले . त्याबाबत रितसर कायदेशिर कार्यवाही करून दोन्ही इसमांना त्यांच्याकडील मोटार सायकलसह ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीता वन परिक्षेत्र अधिकारी , कणकवली यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग ,पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके , पोलीस कॉन्स्टेबल सुधिर सावंत , अनिल धुरी , कृष्णा केसरकर , पोलीस नाईक किरण देसाई , संकेत खाडये , अमित तेली यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!