*कोकण Express*
*सुशांत नाईक हे आपले व्यावसायिक हित पाहून सोयीस्कर भूमिका घेतात*
*शहरातील अनधिकृत बांधकामे किती केली? कणकवली शहरात नवीन प्रकल्पांना विरोध किती केला?*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करत असताना नगरसेवक सुशांत नाईक यांनी स्वतः कणकवली शहरातील अनधिकृत बांधकामे किती केली? कणकवली शहरात नवीन प्रकल्पांना विरोध किती केला? त्याचा अभ्यास करावा. आमदार नितेश राणे व नगरपंचायत हे जनतेचे हित पाहून काम करतात. तर सुशांत नाईक हे आपले व्यावसायिक हित पाहून सोयीस्कर भूमिका घेतात अशी टीका कणकवली उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केली. कणकवली शहरातील भाजी मार्केट होता नये या करिता नगरपंचायत मध्ये पहिला हात वर करणारे सुशांत नाईक होते. कणकवली नगरपंचायत चे कचरा टेंडर आपल्याला मिळवण्यासाठी सुशांत नाईक यांनीच पैसे गुंतवले होते अशी चर्चा कणकवलीत होती. आणि या टेंडर करिता धुळ्याच्या ठेकेदार कंपनीला सुशांत नाईक यांनी त्यांचे भाऊ आमदार वैभव नाईक यांच्यामार्फत कणकवलीत आणले होते. अशीही कणकवलीत चर्चा होती. आटोकाट प्रयत्न करून कचरा टेंडर तुम्हालाच मिळालं होतं. मग ते काम सुरू का केलं नाही? कणकवलीतील कचऱ्याचा प्रश्न जटिल करून सत्ताधारी म्हणून आम्हाला अडचणीत आणण्याचा डाव फसला. आणि आपले पैसे गुंतवले हे नाव उघड झाल्यामुळे नाईक हे ऐनवेळी नेहमीप्रमाणे उघडे पडले. कचरा टेंडर बाबत बोलणाऱ्या सुशांत नाईक यांनी आपल्या आमदार भावाला हाताशी धरून आणलेली धुळे ची एजन्सी जर अधिकृत होती तर वर्क ऑर्डर दिल्यानंतर त्या एजन्सीने काम का सुरू केले नाही? असा सवाल श्री हर्णे यांनी केला. कणकवली शहरात अनधिकृत बांधकामे करून शहरवासीयांची फसवणूक करण्याचे कामच सुशांत नाईक यांनी आतापर्यंत केले. कणकवलीतील महाडिक कॉम्प्लेक्समध्ये देखील काय चुका आहेत ते आम्हाला माहिती आहे. पार्किंगमध्ये गाळे कोणी बांधले ते देखील वेळ आली तर दाखवून देऊ शकतो. महाडिक कॉम्प्लेक्समध्ये फायर एनओसी मिळाली नाही हे देखील आम्हाला माहिती आहे. वेळ आल्यावर सुशांत नाईक यांची ही सर्व अनधिकृत व बेकायदेशीर कामे बाहेर काढणार असा इशारा श्री हर्णे यांनी दिला. श्रीधर नाईक गार्डन साठी 75 लाख नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मंजूर करून आणले. आपल्या वडिलांच्या नावाने असलेल्या गार्डनला सुद्धा सुशांत नाईक यांना राज्यात सत्ता असून देखील निधी आणता आला नाही. अशी टीका त्यांनी केली आहे. आमदार नितेश राणे कणकवलीचे व जनतेचे हित जपण्याकरिता व शहरवासीयांना योग्य सुविधा मिळण्याकरिता जनतेच्या सुरुवाती पासून संपर्कात आहेत. मात्र कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक नगरपंचायतीच्या कारभारात सर्वच ठिकाणी लक्ष देऊ लागल्याने तेथील तत्कालीन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांना कंटाळून राजीनामा दिला. ही वस्तुस्थिती सुशांत नाईक यांनी आपले भाऊ आमदार वैभव नाईक यांच्या कडून तपासून घ्यावी असा टोला श्री. हर्णे यांनी लगावला.