*कोकण Express*
*ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी मनोज तोरस्कर यांची निवड*
*कासार्डे:संजय भोसले*
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी मनोज तोरस्कर यांची निवड करण्यात आली आहे.राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीने ही निवड जाहीर केली आहे.
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी मनोज तोरस्कर यांची निवड झाली असून त्यांनी गेल्या दीड वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा निरिक्षक म्हणून उत्तम कामगिरी बजावून संघटना वाढीसाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सुपूर्द करण्यात आली आहे.अत्यंत शांत,सुस्वभावी व मृदू भाषी तसेच उत्तम संघटन कौशल्य असलेले मनोज तोरस्कर यांना हा बहुमान मिळाला आहे.
यापूर्वी या पदावरती कार्यरत असलेले जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांची ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याने हे पद रिक्त झाले होते.त्यांच्याच पाऊलावरती पाऊल टाकून जिल्हा संघटनेमध्ये नेहमीच त्यांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत असणाऱे जिल्हा निरिक्षक मनोज तोरस्कर कार्यरत आहेत.
एक प्रामाणिक,कार्यक्षम, होतकरू,उच्चशिक्षित तरुण कार्यकर्त्यांची सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निवड सुद्धा अभिनंदनीय असून अभियंता म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व प्रभावशाली आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गात यापुढेही ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ही संस्था अनेक सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितच कार्यरत राहून यशस्वी घौडदौड यापुढेही अधिक जोमाने सुरू ठेवील असा विश्वास नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मनोज तोरस्कर यांनी व्यक्त केला.
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी मनोज तोरस्कर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.