*कोकण Express*
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी,मेंढी विकास महामंडळाला निधीच न मिळाल्याने प्रवीण काकडे नाराज*
*कासार्डे:संजय भोसले*
महाराष्ट्रात धनगर समाज हा दोन नंबरवर असलेला व अतिमागास असलेल्या या धनगर समाजाला नुकत्याच झालेल्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीतीलv महामंडळाला निधी देण्यात वगळण्यात आले. मेढपाळासाठी असणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळास कसलाही निधी दिलेला नसून धनगर समाजावर सातत्याने अन्याय होत असल्याचे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक दि. २८ एप्रिल २०२२ रोजी सामाजिक न्याय विभागाकडून घेण्यात आली. त्यामधे प्रामुख्याने महाराष्ट्रातील महामंडळाना भरीव निधी देण्याचा ठराव करण्यात आला असून त्यामधे महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ ५०० कोटींवरून १००० कोटी, संत रोहिदास उद्योग व चर्मकार विकास महामंडळ ७३ कोटींवरून १००० कोटी, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ ३०० कोटीवरुन१००० कोटीं, दिव्यांग वित्त व विकास महामंडळ ५० कोटींवरून ५०० कोटी असा भरीव निधी देण्यात आला परंतु धनगर समाजाला त्यामध्ये डावलण्यात आले.
महाराष्ट्रात धनगर समाज हा दोन नंबरवर असलेला व अतिमागास असलेल्या धनगर समाजाला यातुन का वगळण्यात आले. मेढपाळासाठी असणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळास कसलाही निधी दिला नाही. महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यापासून धनगर समाजाला कोणत्या सुविधा मागण्या पूर्ण केल्या आहेत त्याचा एकदा तपशील जाहीर करावा.
धनगर समाजाची गेली कित्येक वर्षांपासून एस टी आरक्षण देण्याबाबतची मागणी सर्वच राजकीय पक्षांनी कायमस्वरुपी बाजुलाच ठेवली आहे. धनगर समाजाने काय तुमचे घोडे मारले? का सातत्याने धनगर समाजावर अन्याय करीत आहात मेढपाळावरती दररोज अन्याय होत असून साधी त्याची दखल घेतली जात नाही. डोगरी भागात रहाणाऱ्या समाज बांधवाना सातत्याने वनविभागाच्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. धनगर समाजाला का या सर्वच प्रक्रियेतून जाणुन बुजून वंचित ठेवण्यात आलंय. धनगर समाजाच्या मतावर डोळा ठेवायचा वापरा आणि फेका हीच निती वापरायची ही सर्वच राजकीय पक्षांची निती दिसुन येत आहे. सर्वच राजकीय लोकप्रतिनिधींकडून धनगर समाजाच्या मतावर निवडुण आले आहेत. तरी महाराष्ट्रातील सर्वच मंत्रि खासदार आमदार यांनी धनगर समाजाच्या मागण्या मान्य होणेसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पण तसा अजून कोणीच प्रयत्न करीत नाहीत. सरकारकडून मागील अर्थ संकल्पात कोणत्या स्वरूपात किती निधी देण्यात आला आहे ते जाहीर करण्यात यावे. धनगर समाजाच्या एकाही प्रश्नाची सोडवणूक केलेली नाही. धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीबाबत आज अखेर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. धनगर समाजातील गोरगरीब विद्यार्थी याच्या स्कॉलरशिप बाबतीत. डोंगर दऱ्याखोऱ्यातील गोरगरीब समाज बांधव यांना आजही रस्ते आरोग्य पाणी वीज च्या सुविधांपासून वंचित ठेवण्यात आलंय. अशाप्रकारे धनगर समाजाला सर्वच सोयी सुविधांपासून वंचित ठेवण्यात येणार असेल तर निश्चितच पुढील काळात धनगर समाज होणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.