वैभववाडी तालुक्यातील वाडेकरवाडी व तांबळवाडी येथील रस्त्यांच्या कामांचे सतिश सावंत यांच्या हस्ते लोकार्पण

वैभववाडी तालुक्यातील वाडेकरवाडी व तांबळवाडी येथील रस्त्यांच्या कामांचे सतिश सावंत यांच्या हस्ते लोकार्पण

*कोकण Express*

*वैभववाडी तालुक्यातील वाडेकरवाडी व तांबळवाडी येथील रस्त्यांच्या कामांचे सतिश सावंत यांच्या हस्ते लोकार्पण*

वैभववाडी ः प्रतिनिधी*

जिल्हा वार्षिक योजना आराखड्यातुन नानिवडे गावातील वाडेकरवाडी येथील रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे (रु.५ लाख) तसेच तिथवली गावातील तांबळवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे (रु ५ लाख) पालकमंत्री उदय सामंत यांनी मंजूर केले होते. या दोन्ही  रस्त्यांचे लोकार्पण माजी जिल्हा बँक अध्यक्ष तसेच शिवसेना जिल्हा नेते सतिश सावंत यांनी आज केले. वाडेकरवाडी तसेच तिथवली तांबळवाडी येथील ग्रामस्थांना दिलेला शब्द सावंत यांनी अवघ्या सहा महिन्यात पूर्ण केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने नानिवडे वाडेकरवाडी येथे सतीश सावंत यांचा भव्य असा नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना सावंत यांनी संघटनात्मक बांधणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले तसेच नानिवडे गावातील इतर प्रलंबित विकास कामांसाठी लवकरच अजून १० लाख रुपये पालकमंत्री उदयजी  सामंत व खासदार विनायकजी राऊत यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले. गावातील शिवसेनेची परिपूर्ण बांधणी करा विकास कामांच्या निधीची कोणती काळजी करू नका असे आश्वासन सतीश सावंत यांनी या वेळी दिले. या दोन्ही  रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी युवासेनेचे जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी यांच्या माध्यमातून नानिवडे गावचे शाखाप्रमुख दिपक साळवी, बुथप्रमुख प्रवीण वाडेकर, तिथवलीचे  विठोबा गुरव, शाखा प्रमुख नाना जैतापकर, विजय काडगे यांनी सतीश सावंत यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
या लोकार्पण सोहळ्याला सावंत यांच्या सोबत निवृत्त पोलीस निरीक्षक संदीप सरवणकर, युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी, युवासेना तालुका प्रमुख अतुल सरवटे, विभाग संघटक विलास पावसकर, उपविभाग प्रमुख विशाल राणे, संदीप चौगुले, विठोबा गुरव, नानिवडे सरपंच -संगीता कातकर , युवासेना उपविभाग प्रमुख राजेश पवार, सुनील खाडे, संदीप घनडे, शाखाप्रमुख  दीपक साळवी, नाना जैतापकर, प्रवीण वाडेकर, विजय काडगे, शांताराम मांडवकर, सुभाष इस्वलकर, बबन धुरी, विलास इस्वलकर यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!