सर्व्हिस रोडवर अनधिकृत पार्किंग, दुकान थाटल्यास कारवाई अटळ

सर्व्हिस रोडवर अनधिकृत पार्किंग, दुकान थाटल्यास कारवाई अटळ

*कोकण Express*

*सर्व्हिस रोडवर अनधिकृत पार्किंग, दुकान थाटल्यास कारवाई अटळ….!*

*न.पं.प्रशासन व वाहतूक पोलिसांना आम.नितेश राणेंच्या सूचना…!*

*व्यापारी, पोलीस प्रशासनासोबतच्या बैठकीत निर्णय…!*

*कणकवली ःःप्रतिनिधी* 

कणकवली शहरातील सर्व्हिस रोडवर अनधिकृतपणे पार्किंग करणाऱ्यांवर आणि दुकाने थाटणाऱ्यांवर नगरपंचायत प्रशासन व वाहतूक पोलिसांनी बिनधास्तपणे कारवाई करावी, अशी सूचना आमदार नितेश राणे यांनी केली. शहरातील पार्किंग व्यवस्थेत सुधारणार होण्यासाठी वाहनचालकांनी व विक्रेत्यांनी शिस्त पाळावी,अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा श्री. राणे यांनी दिला.

सर्व्हिस रोडवर अनधिकृत पार्किंग व दुकाने थाटल्यामुळे शहरात वाहतुकीचीसमस्या निर्माण होत आहे. यात सुधारणा आण्यासंदर्भात नगरपंचायतीच्या प.पू.भालचंद्र महाराज सभागृहात आम. नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी व पोलीस प्रशासनासोबत बैठक पार पडली. या बैठकीला नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, वाहतूक पोलीस निरीक्षक अमित यादव,मुख्याधिकारी अवधूत तावडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे,वाहतूक पोलीस प्रकाश गवस, चंद्रकांत माने, नगरसेवक संजय कामतेकर,अभिजीत मुसळे, मेघा गांगण, माजी नगरसेवक किशोर राणे,न. पं. कर्मचारी किशोर धुमाळे, सचिन नेरकर, व्यापारी अनिल हळदिवे, दादा पावसकर, पांडुरंग वर्दम यांच्यासह व्यापारी उपस्थित होते. बैठकीत व्यापाऱ्यांनी त्यांना भेडसावत असलेल्या समस्या श्री. राणे यांच्यासमोर मांडल्या. शहरातील पार्किंग व्यवस्थेत सुधारणा होण्यासंदर्भात नितेश राणेंनी नगरपंचायत प्रशासन व वाहतूक पोलीस यंत्रणेला काही सूचना देखील केल्या. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी जरी न.पं.ची असली तरी याकामी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन श्री. राणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!