मुंबईचा ऑक्सीमेन विशाल कडणे यांचा भांडुप भुषण 2022 पुरस्काराने गौरव

मुंबईचा ऑक्सीमेन विशाल कडणे यांचा भांडुप भुषण 2022 पुरस्काराने गौरव

*कोकण Express*

*मुंबईचा ऑक्सीमेन विशाल कडणे यांचा भांडुप भुषण 2022 पुरस्काराने गौरव*

*दोनदा भांडुप भुषण पुरस्कार मिळवणारा पहिला तरुण*

*कासार्डे:संजय भोसले* 

समाजसेवेत सातत्य आणि चिकाटी असली की समाज आपोआपच आपल्याला गौरवतो ह्या विचारसरणीने सातत्याने गेले एक दशक ज्या उच्चविद्याविभूषित तरुणाने आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून फक्त मुंबईलाच नाही तर अखंड महाराष्ट्राला भुरळ घातली अश्या मुळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील असलेल्या मुंबईच्या ओक्सिमन अशी ओळख असलेल्या विशाल कडणे यांना भांडुप येथे कोकण विकास आघाडीच्या भव्य कार्यक्रमात भांडुप भूषण गौरवाने सन्मान करण्यात आला. विशाल कडणे हे दोनदा भांडुप भुषण पुरस्कार मिळवणारे पहिले तरुण ठरले आहेत.

या कार्यक्रमास स्थानिक खा. मनोज कोटक, आ. आशिष शेलार, आ. श्याम सावंत व मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  कोविड काळामध्ये स्वखर्चाने स्वतःचा जीव धोक्यात घालून कोविड रुग्णांना मोफत ओक्सिजन पुरवण्याचे काम विशाल कडणे यांनी केले होते. मोफत मास्क, औषधे, धान्य इत्यादी यथाशक्ती त्यांनी मोफत वाटले होते. त्यांच्या कार्याचा लंडन बुक ऑफ रेकॉर्डस यांनी नोंद घेऊन विशेष सन्मान केला होता. लंडनच्या महापौरांनी विशाल कडणे यांचे स्वतः फोन करून कौतुक केले होते. ह्याच कार्याची दखल घेत भांडुपमधील कोकणवासीय चाकरमान्यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला भव्य कार्यक्रमात भांडुप भूषण सन्मानाचे आयोजन केले होते.  पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे विशाल कडणे यांना सदर कार्यक्रमास उपस्थित न राहता आल्याने आमदार श्याम सावंत यांच्या हस्ते त्यांनी सदर पुरस्कार त्यांच्या निवासस्थानी स्वीकारला.

विशाल कडणे ह्यांनी सदर पुरस्काराचे श्रेय आपल्या पालकांना आणि हेल्थकेअर फ्रंट वर्कर्सना दिले. विशाल कडणे यांना भांडुप भूषण हा पुरस्कार 2014 साली देखील मिळाला होता. दोनदा भांडुप भुषण पुरस्कार मिळवणारे ते पहिले भांडूपकर ठरले आहेत. या पुरस्कारामुळे समाजाच्या सर्व स्तरातून विशाल कडणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!