*कोकण Express*
*विकासवाडी दारूमने शासकिय मदतीशिवाय ग्रामसहयोगाने २५०मी चा पक्का डांबरी रस्ता करून जिल्ह्यात आदर्श निर्मान केला*
*कासार्डे:संजय भोसले*
कणकवली तालुक्यातील दारुम येथील विकासवाडीकडे जाणार्या रस्त्याचे उद्घाटन रवींद्रनाथ तळेकर आणि मनोहर तळेकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. गेली 15 वर्षे हा रस्ता पूर्णपणे बाद झाला होता. ग्रामस्थांनी स्वत: योगदान देऊन हा रस्ता केला आहे.
दारुम विकासवाडीकडे जाणारा रस्ता गेली अनेक वर्षे होत नव्हता. वारंवार मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष केले जायचे. या रस्त्यामुळे विकासवाडी मध्ये वाहतुक करणे कठिण झाले होते. यामुळे विकासवाडी ग्रामस्थ मंडळ दारुमने पुढाकार घेऊन ग्रामस्थांच्या योगदानामधुन सुमारे 250 मीटर रस्ता डांबरीकरण करुन घेतला.
विशेष म्हणजे शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे विकासवाडी ग्रामस्थांनी सहयोग देऊन 250 मिटरचा पक्का डांबरी रस्ता करुन घेतला. यासाठी प्रविण (बाबू) तळेकर, मनिष तळेकर यांच्या भरीव योगदानासह वाडितील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने हा रस्ता पूर्णत्वास गेला.
विकासवाडी ग्रामस्थ मँडळाची सार्वजनिक पुजा यावेळी आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी मुंबईस्थित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यावेळी विकासवाडी ग्रामस्थ मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.