कुडाळ सोसायटी ; महाविकास आघाडीने एकतर्फी विजय मिळवीत सर्वच्या सर्व १३ जागा काबीज

कुडाळ सोसायटी ; महाविकास आघाडीने एकतर्फी विजय मिळवीत सर्वच्या सर्व १३ जागा काबीज

*कोकण Express*

*कुडाळ सोसायटी ; महाविकास आघाडीने एकतर्फी विजय मिळवीत सर्वच्या सर्व १३ जागा काबीज*

*कुडाळ  ः प्रतिनिधी*

जिल्ह्यात अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कुडाळ पंचक्रोशी विविध कार्यकारी सेवा सोसायटी कुडाळच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकतर्फी विजय मिळवीत सर्वच्या सर्व १३ जागा काबीज केल्या आहेत. मात्र, कुडाळमध्ये महाविकास आघाडीचे कट्टर विरोधी असलेल्या भाजपला येथे एकही जागा जिंकता आली नाही. ही निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी महत्वाची होती. मुख्य म्हणजे काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा असूनही सत्ता कायम ठेवता आली नव्हती. त्यामुळे कुडाळ तालुक्यातील सर्वच निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले होते. आज कुडाळ पंचक्रोशी विविध कार्यकारी सेवा सोसायटी कुडाळच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्व १३ जागा ताब्यात घेत भाजपला पुन्हा एक दणका दिलाय.​ ही निवडणूक शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते आणि नगरसेवक संतोष शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली लढली गेली.या पंचक्रोशीत नेरूर, पावशी , मुळदे, आंबडपाल आणि कुडाळ ही गावे येतात. या निवडणुकीत स्नेहल पडते, विद्याप्रसाद बांदेकर, बाबा पडते, संजय पालव, सुनीता सडवेलकर, नंदू माणगावकर, नारायण तवटे असे महा विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!