*कोकण Express*
*वेंगुर्ले तालुक्यातील खानोली येथील सिद्धेश्वर विवीध कार्य.सोसायटीच्या चेअरमनपदी भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर यांची बिनविरोध निवड*
*व्हॉईस चेअरमनपदी भाजपाचे खानोली गावचे उपसरपंच सुभाष खानोलकर यांची बिनविरोध निवड*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
खानोली येथील सिद्धेश्वर विवीध कार्य.सोसायटीच्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत गाव विकास पॅनल ने पॅनल प्रमुख महेश प्रभुखानोलकर यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळवले व विरोधकांचा दारुण पराभव केला . १३ पैकी १२ जागा जिंकून विरोधकांना धोबीपछाड केले .
तोच सिलसीला कायम राखत चेअरमनपदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवड करत आपले वर्चस्व कायम राखले .
निवडणुक अधिकारी कावले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडी ह्या प्रत्येकी एकच फार्म भरल्यामुळे बिनविरोध झाल्या .
या निवडीच्या नंतर भाजपा च्या वतीने प्रदेश का का सदस्य शरदजी चव्हाण व जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी चेअरमन प्रशांत खानोलकर व व्हा.चेअरमन सुभाष खानोलकर यांचे पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले . तसेच खानोली गावच्या सरपंचा प्रणाली खानोलकर यांनीही गावाच्या वतीने दोहोंचा सत्कार केला .
यावेळी भाजपा जिल्हा का.का.सदस्य रामकृष्ण उर्फ बाळा सावंत , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ , प्रभारी ज्ञानेश्वर काळजी , पॅनल प्रमुख महेश प्रभुखानोलकर , माजी चेअरमन मधुकर खाडे , माजी चेअरमन प्रसाद प्रभु , सिद्धेश्वर प्रभुखानोलकर , बुथप्रमुख बाळु खानोलकर , सुनील घाग , संजु प्रभु , रत्नाकर खानोलकर , *संचालक* – शामसुंदर मुननकर , विलास सावंत , नाना कोळेकर , निता कोळेकर , भाई खानोलकर , महेश कांबळी , विजय सातार्डेकर , संतोष खानोलकर , अनंत प्रभु , रत्नप्रभा खानोलकर . पोलिस पाटील धोंडु खानोलकर , सुनील सावंत तसेच खानोली गावचे ग्रामस्थ उपस्थित होते .