*कोकण Express*
*किसार्डेतील नागसावंतवाडी प्राथ. शाळेला शैक्षणिक वस्तू व खेळाचे साहित्य भेट*
*कासार्डे:प्रतीनीधी*
एस बी एच स्टाफ असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी कॉ प्रशांत धामणगावकर यांनी ए आय बी ई ए या बँक कर्मचाऱ्यांच्या अखिल भारतीय संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त नागसावंतवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला शैक्षणिक वस्तू व खेळाचे साहित्य भेट दिले. याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.
या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष कॉ रवींद्र धामणगावकर यांनी मार्गदर्शनात शाळेतील मुलांना अभ्यासाबरोबर स्वतःच्या शारीरिक तंदुरीस्तीची आवश्यकता समजावून सांगितली.
शाळेतील कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष कॉ. बी. एस. सावंत यांच्या हस्ते शाळेला आवश्यक इतर वस्तूंचे वाटप झाले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यपिका श्रीमती शेख ह्यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी ग्रामपंचायत सदस्य अतुल सावंत व सचिन वंजारे यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमास शाळेतील कर्मचारी वर्गांचे प्रतिनिधित्व सौ. सावंत आणि ग्रामस्थातर्फे नंदकुमार सावंत, दिपक सावंत, अनिकेत देसाई आदी उपस्थित होते.