भिरवंडे सोसायटीवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व

भिरवंडे सोसायटीवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व

*कोकण Express*

*भिरवंडे सोसायटीवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व…!*

*शिवसेना नेते सतीश सावंत यांनी केले विजयी उमेदवारांचे अभिनंदन…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

भिरवंडे विविध कार्यकारी सोसायटीच्या रविवारी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत 10 जागांपैकी 6 जागा जिंकून शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व मिळविले. यापूर्वी शिवसेनेच्या 3 जागा बिनविरोध झाल्या होत्या. शिवसेना नेते सतीश सावंत यांची रणनीत यशस्वी झाली.

भिरवंडे सोसायटीच्या निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपमध्ये चुरस होती. शिवसेनाप्रणित जय सहकार पॅनल विरुद्ध भाजपप्रणित रामेश्वर दिर्बादेवी पॅनल यांच्यात लढत झाली. विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये प्रकाश लक्ष्मण घाडीगावकर 260 मते, चंद्रशेखर अनंत सावंत 257 मते, बेनी पेद्रू डिसोजा 254 मते, अरविंद मधुसूदन सावंत 255 मते, तुषार भगवान सावंत 254 मते, मंगेश बळीराम सावंत 252 मते, प्रदीप तुकाराम सावंत 250 मते, रमेश देऊ सावंत 249 मते, महिला गटातून दीपा पंढरी सावंत 252 मते, सौ. स्मिता प्रदीप सावंत 257 मते हे उमेदवार विजयी झाले आहेत.तर यापूर्वी अनुसूचित जाती गटातून संजय सुभाष कदम, इतर मागास गटातून सदानंद अनंत मेस्त्री आणि भटक्या विमुक्त जमाती गटातून सिद्धेश शामू पटकारे बिनविरोध निवडून आले होते. सर्व 13 ही उमेदवाराचे शिवसेना नेते सतीश सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत, पं.स. सदस्य मंगेश सावंत व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!