*कोकण Express*
*८ते १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे कौशल्य विकास उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन*
*२५एप्रिल पासून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा उपक्रम*
*कासार्डे:- संजय भोसले*
खेळाच्या प्रचार व प्रसार यानुसार फक्त खेळाडूंचा जास्तीत जास्त सहभाग व संघाची संख्या वाढवणे यावर लक्ष केंद्रित न करता गावपातळी पासून चांगले उत्तम कौशल्य आत्मसात केलेले खेळाडू तयार होणे अपेक्षित आहे. यासाठी ८ ते १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यासाठी तालुकास्तर, जिल्हास्तरावर खेळ निहाय व शारीरिक क्षमता (Physical Fitness) खेळांचे प्राथमिक कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रस्सीखेच,मैदानी,खो-खो, कबड्डी, बॅडमिंटन, आणि जलतरण या खेळांचा समावेश आहे.
या खेळामध्ये सहभाग वाढून, शारीरिक क्षमता, शारीरिक सुदृढता यामध्ये वाढ होऊन शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या मार्फत उन्हाळी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम. विद्या शिरस यांनी जिल्हावासियांना केले आहे.
*पुढील वेळापत्रकाप्रमाणे शिबाराचे आयोजन*
दि. 25 एप्रिल ते 5मे स.9 ते 11रस्सीखेच ठिकाण- कुडाळ हायस्कूल कुडाळ, दि. 26 ते 5 मे स. 7 ते 9- मैदानी- ठिकाण- तालुका क्रीडा संकुल वेंगुर्ले, दि.26 एप्रिल ते 6 मे वेळ -स. 7 ते 10 -खोखो- ठिकाण- तालुका क्रीडा संकुल वेंगुर्ले, दि 26 एप्रिल ते 6 मे सायंकाळी 4 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कबड्डी -ठिकाण -तालुका क्रीडा संकुल वेंगुर्ले, दि. 22 मे ते 30 मे स.8 ते 10 बॅडमिंटन -ठिकाण- जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग, दि. 22 मे स. 10 ते 12 जलतरण- ठिकाण- जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग
तरी वरील या खेळांच्या शिबीरासाठी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यातर्फे करण्यात आले आहे.