भाजपा स्थापना दिनानिमित्त भाजपा शक्तिकेंद्रप्रमुखांच्या घराच्या दरवाजावर लावले नामफलक

भाजपा स्थापना दिनानिमित्त भाजपा शक्तिकेंद्रप्रमुखांच्या घराच्या दरवाजावर लावले नामफलक

*कोकण Express*

*भाजपा स्थापना दिनानिमित्त भाजपा शक्तिकेंद्रप्रमुखांच्या घराच्या दरवाजावर लावले नामफलक*

*भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांचा उपक्रम*

*कणकवली  ः प्रतिनिधी*

भाजपा स्थापना दिन सप्ताह साजरा करीत असताना कणकवली भाजपा ग्रामीण मंडल मधील 14 शक्तिकेंद्रप्रमुखांच्या घराच्या दरवाजावर शक्तिकेंद्रप्रमुखांच्या नावाचा नामफलक लावण्यात आले आहेत. 14 शक्ती केंद्र प्रमुखच्या घरावर नामफलक लावत कणकवली भाजपा ग्रामीण मंडल हा जिल्ह्यात सर्वात प्रथम कार्यक्रम रावबिला असल्याची माहिती भाजपा कणकवली ग्रामीण मंडल अध्यक्ष संतोष कानडे यांनी दिली.

भाजप स्थापना दिन सप्ताह निमित्त शक्ती केंद्र प्रमुख घरावर नाम फलक लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी चिंचवली सूर्यकांत भालेकर, खारेपाटण सुधीर कूबल, वारगाव राजेश जाधव, तिवरे रवींद्र आंबीलकर, सावडाव दत्ता काटे, साकेडी बंडू साटम, बीडवाडी राजेश हीर्लेकर, वागदे संदीप सावंत, कलमठ स्वप्नील चिंदरकर, कलमठ विजय चिंदरकर, वरवडे सदा चव्हाण, तळवडे भाई सावंत, कळसूली सचिन पारधीये, ओसरगाव गजानन तळेकर यांच्या घरावर शक्ती केंद्र प्रमुख नाम फलक लावण्यात आले. यावेळी भाजपा कणकवली ग्रामीण मंडल अध्यक्ष संतोष कानडे यांच्यासमवेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक संचालक समीर सावंत, कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, माजी उपसभापती महेश गुरव, भाजप तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!